Maharastra Home Ministry decides to punish Caste-crimes

06Aug09

A welcome decision- Ministry of Home affairs Maharastra state, has decided now to take stringent yet punitive actions against perpetrators of Caste violence in the wake of rising Caste-Atrocity cases in the State. The top officials along with Minister for state agreed to come forward to implement POA act 1989 to fullest. Village in which Dalit families find caste-trouble are liable to capital punishment under the Act.

Also there are supportive provisions (which are deadwoods)like State is made responsible for rehabilitation of Dalit families. Moreover, State could stop resource supply to such village-assemblies.

The concrete provisions of community punishment do exist in POA Act 1989 which is under Centre’s purview. The State can not repeal and amend them only can implement them.The act is a product of constitutional guarantee Article 16, fundamental right defying practice of untouchability.

None of the times, till date, village punished as a whole even when many Dalit families suffered and died due to upper-caste-terror. The terror has reached in 60 years of life after Constitution. No idea what fate Home Ministry’s resolution will have ! Lets watch !

SAKAL MARATHI NEWSPAPER NEWS:
मुंबई – एकाच गावात वारंवार दलित व आदिवासी अन्याय-अत्याचाराच्या घटना घडत असतील, तर अशा गावाला अत्याचारग्रस्त गाव म्हणून घोषित करण्याचा आणि त्या गावाला शासनाकडून मिळणारा सर्व प्रकारचा विकासनिधी बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज गृहराज्यमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गृह विभागाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर गुन्हेगाराची मालमत्ता जप्त करण्याचा तसेच त्याला तडीपार करण्याच्या कायदेशीर तरतुदीची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेशही डॉ. राऊत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

बीड जिल्ह्यात अलीकडेच दलित अत्याचाराच्या अनेक घटना घडल्यामुळे नितीन राऊत यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिल्यानंतर राज्यभरातील ऍट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. कायद्यातील पळवाटा काढून गुन्हेगार राजरोसपणे मोकाट फिरतात, पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली जाते, अशी शेकडो प्रकरणे निदर्शनास आली. त्यानंतर डॉ. राऊत यांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज मंत्रालयात त्यांनी गृह विभागाची बैठक घेतली. या बैठकीला गृह विभागाच्या प्रधान सचिव ऍना दाणी, अप्पर पोलिस महासंचालक राज खिलनानी, विशेष पोलिस महानिरीक्षक सी. प्रभाकर व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


राज्यात दलित-आदिवासींवरील अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी ऍट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश गृह राज्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. एकाच गावात दलित व आदिवासींवर वारंवार अत्याचार झाल्यास ऍट्रॉसिटी कायद्यातील कलम 16 मधील तरतुदीनुसार त्या गावाला सामूहिक दंड करण्याच्या शिक्षेची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर कलम 10 नुसार गुन्हेगाराची मालमत्ता जप्त करणे व त्याला तडीपार करण्याची कारवाई करावी, असे आदेशही या वेळी देण्यात आले.
एखाद्या गावात सातत्याने दलित अत्याचाराच्या घटना घडत असतील, तर अशा गावाला अत्याचारग्रस्त गाव म्हणून घोषित करण्याची ऍट्रॉसिटी कायद्याच्या कलम 17 ( 1) मध्ये तरतूद आहे. त्याचा अशा घटनांमध्ये पुरेपूर वापर करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अशा गावाच्या वेशीवर अत्याचारग्रस्त गाव म्हणून पाटी लावली जाते. या गावाला शासनाकडून मिळणारा सर्व प्रकारचा निधी बंद केला जातो. त्या गावातील अत्याचारग्रस्त दलित व आदिवीसींचे पुनर्वसन केले जाते. गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी ऍट्रॉसिटी कायद्यातील अशा प्रकारच्या तरतुदींची कडक अंमलबजावणी करण्याचा व गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचा आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.



2 Responses to “Maharastra Home Ministry decides to punish Caste-crimes”

  1. Love the new look, keep up the great work the number of visitors must have increased?.

  2. 2 KUMARPUSHP

    these hindu led government know about election,hindus are born barbaric and please donot trust them.


Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s


%d bloggers like this: